Breaking News

वाजे, दुंदरे येथे शेकापला धक्का

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांतील नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत वाजे आणि दुंदरे येथील शेकापच्या अनेक पदाधिकर्‍यांनी कमळ हाती घेतल्याने ग्रामीण भागात शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती कायम आहे.  भारतीय जनता पार्टीच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेशावेळी शेतकरी कामगार पक्षाचे दुंदरे येथील जयवंत पाटील, वाजे ग्रामपंचायतीचे सदस्य काळुराम हंबीर, बुधाजी हंबीर, बाळू कांबडी, राजेश खैर, हिरामण खैर, शिमग्या बंगारी, हिरामण बंगारी, अमित खैर, पिंट्या वाघ, मधू हंबीर, मयूर हंबीर, बाळू खैर, बाळू कांबडी, संजय बंगारी, पिंटू निरगुडा, संदीप हंबीर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, प्रभाग क्रमांक 20चे अध्यक्ष मनोहर मुंबईकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply