Breaking News

टेबल टेनिस स्पर्धेस भरघोस प्रतिसाद

अनिशा, दजांग एकेरीचे विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्त

लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. ही स्पर्धा नवीन पनवेल येथील सिडको समाजमंदिरात खेळली गेली.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे संस्थापक व अध्यक्ष संजय सुदाम कडू यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत 270 खेळाडूंनी सहभाग घेतला. बक्षीस वितरण लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्ष शोभा गिल्डा व मीना पोतदार यांच्या हस्ते झाले. पारितोषिक वितरण समारंभास लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या सेक्रेटरी ज्योती देशमाने, खजिनदार व स्पोर्ट्स प्रोजेक्ट चेअरमन लायन राजेंद्र जेसवानी, उपाध्यक्ष भावना जेसवानी, तसेच संजय पोतदार, नागेश देशमाने़, अशोक गिल्डा, रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या उपाध्यक्ष स्नेहल कडू आणि लायन्स व लिओ क्लबचे सभासद उपस्थित होते. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून पराग अंकोलेकर, राजेश कुरबेट व पुरणसिंग मेहरा यांनी काम पाहिले.

गटनिहाय निकाल (विजेता व उपविजेता)

नवोदित : मुली-वेदिका भगत सेंट जोसेफ हायस्कूल नवीन पनवेल, तनिक्षा प्रशांत मोकल डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, मुले-प्रणव गर्ग प्रेझेंटेशन कॉन्हेंट स्कूल नेरूळ, अखिल गुब्बाला रायन इंटरनॅशनल स्कूल खारघर; 10 वर्षाखालील  : मुली-इशा जाधव डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, स्वस्ती सचिन भोईर डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, मुले-शिवेश तांबोळी डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, हर्षद अनिल कुदळे सेंट जोसेफ हायस्कूल नवीन पनवेल; 12 वर्षाखालील : मुली-आदिती जाधव डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, अनिशा पात्रा, डीएव्ही इंटरनॅशनल स्कूल खारघर, मुले-सिद्धार्थ गुब्बाला, तुषार खांडेकर बालभारती स्कूल खारघर; 14 वर्षाखालील : मुली-आदिती जाधव, तन्वी कदम सेंट जोसेफ हायस्कूल नवीन पनवेल, मुले-सिद्धार्थ गुब्बाला, तुषार खांडेकर; 17 वर्षाखालील : मुली-आदिती जाधव, अनिशा पात्रा, मुले-सिद्धार्थ गुब्बाला, वेदांत मोकाटी बालभारती पब्लिक स्कूल खारघर; युथ : मुली-आदिती जाधव, अनिशा पात्रा, मुले-सिद्धार्थ गुब्बाला, आदित्य मित्रा; 12 वर्षाखालील दुहेरी : मुली-इशा जाधव डीएव्ही स्कूल नवीन पनवेल व मनाली चिलेकर सीकेटी स्कूल नवीन पनवेल, तनिक्षा प्रशांत मोकल व स्वस्ती भोईर, मुले-कृष्णतन्मय गंगाराजू एपिजे स्कूल नेरूळ व सिद्धार्थ देशपांडे डीएव्ही इंटरनॅशनल स्कूल खारघर,  तरुण चंद्रकुमार व विरेन मन्याल दोघेही डॉन बॉस्को पब्लिक स्कूल नेरूळ; 14 वर्षाखालील दुहेरी : मुली-आदिती जाधव व अनिशा पात्रा, रित राजेंद्र शर्मा व रसिका खाडे दोघीही सेंट जोसेफ हायस्कूल नवीन पनवेल, मुले-सिद्धार्थ गुब्बाला व तुषार खांडेकर, मांगल्य खानावकर डीएव्ही स्कूल नवीन पनवेल व अलिझर सिद्धीकी बालभारती पब्लिक स्कूल खारघर; पुरुष दुहेरी-सनीत पाटील नवीन पनवेल व अमित चव्हाण नवी मुंबई, राहुल सारडे एसआयईएस नेरूळ व सिद्धार्थ गुब्बाला; एकेरी : महिला-अनिशा पात्रा, आदिती जाधव; पुरुष-दिजांग कामसन उलवे नोड, राहुल सारडे, ज्येष्ठ जयदीप मिश्रा नवी मुंबई, असिफ शेख ऐरोली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply