Breaking News

प्रकल्पग्रस्त कामगार जेएनपीटी बाहेर जाणार नाहीत -सुधीर घरत

उरण : वार्ताहर

जेएनपीटीतील प्रकल्पग्रस्त कामगार पोर्ट बाहेर जाणार नाहीत. ते जेएनपीटीतच काम करतील, असे भारतीय पोर्ट अ‍ॅण्ड डॉक मजदूर महासंघाचे राष्ट्रीय खजिनदार कामगार नेते सुधीर घरत यांनी म्हटले आहे.पॅरादिप (ओरिसा) येथे होत असलेल्या भारतीय पोर्ट अ‍ॅण्ड डॉक मजदूर महासंघाच्या राष्ट्रीय कायकरिणीत जेएनपीटीच्या खाजगीकरणाबाबत घरत यांनी विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, जेएनपीटी बंदर हे प्रकल्पग्रस्तांच्या जागेवर उभे आहे, स्थानिकांच्या त्यागातून हे बंदर उभे राहीले आहे, प्रकल्पग्रस्त म्हणून स्थानिकांना नोकर्‍या मिळाल्या आता बंदराचे खाजगीकरण होणार आहे. तेव्हा जे कामगार विशेष स्वेच्छानिवृत्ती स्विकारणार नाहीत. त्यातील उर्वरित काही कामगारांना वाढवण बंदरात कामासाठी पाठवण्याचा घाट जेएनपीटी प्रशासनाने घातला आहे. त्याला जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचा ठाम विरोध आहे. ज्यावेळी खाजगी करणाच्या विषयावर सुरुवातीस सर्व युनीयन सोबत जेएनपीटी प्रशासनाने चर्चा केली होती. जेएनपीटीने खजगीकरणाच्या नावाखाली प्रकल्पग्रस्त कामगारांना हाकलवून लावण्याचा जो प्रयत्न चालविला आहे तो हाणून पाडणार. येत्या काही दिवसांत महासंघाच्या वतीने केंद्रीय जहाज मंत्र्यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्त म्हणून कामाला लागलेल्या कामगारांच्या हिताचे रक्षण करणार अशी माहिती घरत यांनी दिली. वेळप्रसंगी युनियनचे सल्लागार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारू व प्रकल्पग्रस्त कामगारांच्या हिताचे रक्षण करू, असेही घरत यांनी म्हटले. या राष्ट्रीय कार्यकारणीत भारतीय पोर्ट अ‍ॅण्ड डॉक मजदूर महासंघाचे अध्यक्ष भवानी शंकर, सरचिटणीस सुरेश पाटील, प्रभारी अण्णा धुमाल, बीएमएसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश्वर राव व सर्व मेजर पोर्टमधून आलेले महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply