Breaking News

बालसंरक्षण कक्षातर्फे मतदार जनजागृती

कर्जत : प्रतिनिधी

जिल्हा महिला बालविकास कार्यालयाच्या अंतर्गत जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या वतीने कर्जत शहरात शुक्रवारी (दि. 11) मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानात नागरिकही सहभागी झाले होते. जिल्हा महिला बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बालसंरक्षण कक्ष कर्जत येथील संरक्षण अधिकारी डॉ. कालिदास शिंदे, राम म्हस्के, सुजाता सपकाळ, सामजिक कार्यकर्ते अजिनाथ  काळे, स्वप्नील गवाणकर, दशरथ चौधरी, अविनाश बदे, संदीप गवारे आदींनी शुक्रवारी आठवडा बाजाराचे औचित्य साधून मतदार जनजागृती अभियान राबविले. आठवडा बाजार असल्याने खेड्यापाड्यातून वाडीवस्तीतील ग्रामस्थ खरेदीकरिता मोठ्या संख्येने येतात. जास्तीत जास्त मतदारांची जनजागृती व्हावी यासाठी हे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. अशाच प्रकारचे अभियान नेरळ तसेच तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या परिसरात राबविण्यात येणार असल्याचे संरक्षण अधिकारी राम म्हसकर यांनी सांगितले. 19 ऑक्टोबरपर्यंत खालापूर, पनवेल व उरण तालुक्यातही मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply