उपसरपंचांसह लोहारे आदिवासीवाडीतील कार्यकर्ते शिवसेनेत
पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील काँग्रेस पक्षामध्ये भूलथापा दिल्या जात असल्याचा अनुभव आल्याने अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा त्याग करून शिवसेनेमध्ये प्रवेश घेण्यास सुरुवात केली असून कोतवाल बुद्रुकच्या महिला उपसरपंच आणि कार्यकर्ते तसेच लोहारे आदिवासीवाडीतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार भरत गोगावले यांच्या महाड येथील शिवनेरी निवासस्थानी कोतवाल बुद्रुकच्या काँग्रेस पक्षाच्या उपसरपंच शामली श्रीकांत पार्टे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या रेखा विजय गायकवाड यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, माजी राजिप सदस्य मुरलीधर दरेकर, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, मुंबईतील शाखाप्रमुख संजय कदम, कोतवाल शाखाप्रमुख संजय पार्टे, पोलादपूर शहरप्रमुख सुरेश पवार, अविनाश शिंदे आदी उपस्थित होते. लोहारे आदिवासीवाडीतील महादेव जाधव, गणेश जाधव, विमल पवार, जानू मुकणे, रामा वाघे, दीपक पवार, चंद्रकांत पवार, शांताबाई वाघमारे, चंद्रभागा जाधव, विठोबा पवार, संतोष वाघे, मारुती पवार, शांताराम वाघे, मंगेश पवार, पांडुरंग पवार, दगडू जाधव, लता जाधव, बालाजी पवार, उमेश जाधव, काळी वाघमारे, गोपीनाथ मुकणे, सुनंदा मुकणे, कमल पवार, सीमा पवार, नंदा पवार, आशा जाधव, राहुल वाघे, पार्वती वाघे, योगिता वाघे, अशोक वाघमारे, सीता पवार, पूनम पवार, सुषमा मुकणे, उषा जाधव, सायबू जाधव, गौरी जाधव, संजय जाधव, वंदना वाघे आणि देवजी पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, माजी राजिप सदस्य मुरलीधर दरेकर, संपर्कप्रमुख किशोर जाधव, कबड्डी असोसिएशनचे संदेश कदम, नायक मराठा समाज अध्यक्ष सुनील मोरे, कुडपण उपसरपंच रवी चिकणे उपस्थित होते.