Breaking News

चर्नी रोड येथे निवासी इमारतीला आग

मुंबई : प्रतिनिधी

चर्नी रोड येथील ड्रीमलँड सिनेमाजवळ एका निवासी इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. इमारतीत अनेक जण अडकल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे.

मुंबईतील चर्नी रोड येथे ड्रीमलँड सिनेमाजवळील एका निवासी इमारतीला रविवारी सकाळी भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच काही वेळाने अग्निशमन दलाचे बंब आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. इमारतीमध्ये अनेक रहिवासी अडकले होते. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. अजूनही बचावकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण समजू शकलेले नाही.

तत्पूर्वी, आग लागलेल्या इमारतीत सात ते आठ जण अडकल्याचं सुरुवातीला सांगण्यात येत होतं. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. काही वेळानं अग्निशमन बंब आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ बचावकार्य हाती घेतलं. काही कर्मचार्‍यांनी क्रेन आणि शिडीच्या मदतीनं इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढलं. दरम्यान, इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एक व्यक्ती बेपत्ता झाली होती. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. या मजल्यावरून धुराचे लोट बाहेर पडत होते. याशिवाय मजल्यावर आगीमुळं कमालीची उष्णता होती. अग्निशमन कर्मचारी कृत्रिम श्वसन यंत्रणेच्या मदतीनं मजल्यावर प्रवेश केला. ती व्यक्ती चौथ्या मजल्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली. त्या व्यक्तीला जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान, आगीमुळं सगळीकडं धूर पसरला होता. त्यात एकूण तिघे जण गुदमरले. त्यातील एक जण जखमी झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply