


उरण : विधानसभा मतदारसंघातील बुलंद आवाज महेश बालदी यांच्या प्रचाराला रसायनी विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह असलेल्या ‘शिट्टी’चा आवाज संपूर्ण उरण विधानसभा मतदारसंघात जोरदार घुमत आहे. त्याअंतर्गत शनिवारी गुळसुंदे येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून महेश बालदी यांच्या प्रचार दौर्याला सुरुवात झाली.