
उरण : रामप्रहर वृत्त
उरण तालुक्यातील आवरे गावचे सुपुत्र व वीर जवान संतोष नामदेव ठाकूर हे 20 वर्षे देशाची सेवा केल्यानंतर नुकतेच निवृत्त झाले. त्यानिमित्त ग्रामस्थांकडून त्यांची रविवारी (दि. 10) भव्य मिरवणूक काढून जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
देशसेवेत सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 20 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर जवान संतोष ठाकूर 31 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले. यशस्वीपणे देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले ठाकूर यांच्या कार्याची माहिती परिसरातील तरुणांना व्हावी व गावाचे नाव उज्ज्वल केल्यानिमित्त गावच्या वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी दुपारी 2 वाजता आवरे येथील भोलानाथ मंदिरात होणार आहे. प्रथम मिरवणूक व नंतर सत्कार अशी कार्यक्रमाची रूपरेषा असल्याची माहिती वीर जवान संतोष ठाकूर (बंटी) वर्गमित्र मंडळ व आवरे ग्रामस्थांनी दिली.