
पनवेल : वार्ताहर
येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात नुकताच योगदिन प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रमा भोसले व इन्स्टिट्यूट ऑफ योग अॅण्ड आयुर्वेद व आरोग्य सेवा केंद्राचे प्रशिक्षक सूर्यकांत फडके उपस्थित होते. या वेळी विपुल ठक्कर, संगीता देशमुख, सुप्रिया सुबवेकर, नीता मराठे यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यात महाविद्यालयाचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रथम वर्ष बॅचने सक्रिय सहभाग घेतला.