Breaking News

उरण येथे श्रीक्षेत्र माणकेश्वर येथे यात्रा

उरण : वार्ताहर

येथील केगावमधील श्रीक्षेत्र माणकेश्वर तीर्थक्षेत्र   म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवमंदिरात त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त यात्रेचे अयोजन मंगळवार (दि. 12)नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. यात्रेकरूंनी सकाळपासूनच गर्दी केली होती. सायंकाळी 7 वाजता मंदिरासमोरील दीपमालेचे दीपपूजन सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) विठ्ठलराव दामगुडे व केगावचे सामाजिक कार्यकर्ते नितीन मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते दीपपूजन करण्यात आले.

माणकेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश शरद म्हात्रे, सचिव दिगंबर म्हात्रे, सदस्य रूपेश आत्माराम ठाकूर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. या वेळी केगाव ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र ठाकूर, माजी सरपंच नयन म्हात्रे, माजी सरपंच मोतीराम म्हात्रे, केगाव ग्रामपंचायत सदस्य, उरण नगर परिषद उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक कौशिक शहा, नगरसेवक राजेश ठाकूर, मनोहर सहातीया, के. डी. म्हात्रे व केगाव ग्रामस्थ, तसेच मान्यवर उपस्थित होते.

मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या यात्रेत उरण तालुका व रायगडमधील पांचक्रोशीतील भाविकांनी यात्रेत येऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले. या यात्रेत फुलवाले, मिठाईवाले, खेळणीवाले यांची दुकाने थाटण्यात आली होती.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply