Breaking News

खेळाच्या माध्यमातून जीवनात यश मिळवता येते -आरेकर

मुरूड : प्रतिनिधी

 शरीर ही आपली महत्त्वाची संपत्ती असून, खेळ हे शरीर सुदृढ करण्याचे साधन आहे. जीवनात यश मिळवायचे असेल तर खेळ महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुरूड नगर परिषदेचे पर्यटन सभापती पी. के. आरेकर यांनी येथे केले.

सर एस. ए. हायस्कूल व स्व. म. ल. दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उदघाटन पांडुरंग आरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी समाजसेवक विजय सुर्वे त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात आरेकर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. खेळाच्या माध्यमातून जीवनात यश मिळवता येते, असे त्यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन दीपाली रोटकर यांनी केले. विजय सुर्वे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.  जंजिरा विद्या मंडळाचे अध्यक्ष सुधाकर दांडेकर, उपाध्यक्ष प्रतिभा जोशी, सचिव चंद्रकांत अपराध, संचालक प्रमोद भायदे, मुख्याध्यापक सरोज राणे, उपमुख्याध्यपक दिनकर पाटील, पर्यवेक्षक रमेश मोरे, विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व गुंजाळ व स्नेहा पानवलकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. बालाजी घुगे यांनी आभार मानले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply