खालापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित दहाव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा शनिवारी (दि. 22) खालापूर तालुक्यातील देवन्हावे येथील नोव्हाटेल इमॅजिका या ठिकाणी प्रारंभ झाला. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात त्यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा मान यंदा रायगड जिल्ह्याला मिळाला दोन दिवस आध्यात्मिक, धार्मिक पर्वणी आहे. उद्घाटन समारंभाला आमदार महेंद्र थोरवे, वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील (काकाजी) दिनेश डिंगले, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुब तांबोळी, सुनील पाटील यांच्यासह वारकरी उपस्थित होते. या सोहळ्यात 25 वारकरी दिंड्या सहभागी झाल्या होत्या.
Check Also
जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …