Breaking News

अश्वरोहक फवाद मिर्झा ऑलिम्पिकसाठी पात्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आशियाई क्रीडा

स्पर्धेतील दुहेरी पदकविजेत्या फवाद मिर्झाने अश्वारोहणमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे. 27 वर्षीय फवादने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान गाठून दोन दशकांची भारताची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे.

आंतरराष्ट्रीय अश्वारोहण महासंघाकडून 20 फेब्रुवारी 2020ला यासंदर्भात अधिकृत पुष्टी मिळू शकेल. याआधी इम्तियाझ अनीस (2000, सिडनी) आणि आय. जे. लांबा (1996, अटलांटा) यांनी ऑलिम्पिक अश्वारोहमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. फवादने सहा पात्रता प्रकारांत एकूण 64 गुण कमावले.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply