Breaking News

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी पुन्हा एकदा गुणवंत खेळाडू घडविण्यात यशस्वी ठरली आहे. अकॅडमीतून प्रशिक्षण घेत असलेल्या काही होतकरू खेळाडूंनी जिल्हा व राज्य स्तरावर आपली दमदार छाप पाडत निवड मिळवली आहे.
अमेय महेंद्र पाटील (टाकीगाव, उरण) याची महाराष्ट्र अंडर-१६ संघात, स्मित सुधीर पाटील (वशेणी, उरण), ओम सचिन म्हात्रे (बोरी, उरण) आणि दक्ष धनेश्वर पाटील (खोपटा, उरण) यांची रायगड अंडर-१९ संघात निवड झाली आहे. त्याचप्रमाणे जिज्ञासा नित्यानंद कडू (न्हावेखाडी, पनवेल) हिने रायगड अंडर-१५ संघात स्थान मिळवून अकॅडमीचा मान उंचावला आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंचा गौरव करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीला भेट दिली. त्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अकॅडमीचे अध्यक्ष अमित कडू, सचिव राजेश पाटील, खजिनदार सुजित ठाकूर, कोच मनोज लोखंडे, सुमित चौहान तसेच अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते. अकॅडमीच्या या उल्लेखनीय पावलामुळे पनवेल, उरण परिसरातील क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply