Breaking News

पनवेलमध्ये घुमला ‌‘कृष्ण वेणुनाद‌’

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला ‌‘कृष्ण वेणुनाद‌’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम रविवारी पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उत्साहात पार पडला.
एकनाथ ठाकूर गुरुकुल निर्मित आणि रंगरचना कलामंच, पनवेल यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ बासरीवादकांनी सुमारे ५० हून अधिक बासरीवादकांसह अनोखी स्वरयात्रा सादर केली. या सुरेल मैफलीने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमात इंडियन आयडल फेम गायिका प्रज्ञा गावंड यांनीही आपल्या मधुर आवाजाने रंगत वाढवली.
या कार्यक्रमास लोकनेते रामशेठ ठाकूर, कामगार नेते रवि नाईक, प्रसिद्ध गायक गोपाल पाटील, भाजप सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, हास्यसम्राट संजीवन म्हात्रे, चिन्मय समेल हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संगीत संयोजन विवेक ठाकूर यांनी केले, तर निवेदन विजय पवार यांनी प्रभावीपणे सादर केले. मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेतला.
दरम्यान, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्त वर्षभर अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम सुरू आहेत.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply