तिघांचा मृत्यू; 153 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 16) कोरोनाचे 212 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 153 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 148 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 125 रुग्ण बरे झाले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 64 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 28 रुग्ण बरे झाले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल मिरची गल्ली, कामोठे सेक्टर 34 मानसरोवर कॉम्प्लेक्स, कळंबोली सेक्टर 16 ई रोडपाली येथे प्रत्येकी एक अशा तीन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आढळलेल्या रुग्णांत पनवेल 23, नवीन पनवेल 29, खांदा कॉलनी 12, कळंबोली 22, कामोठे 34, खारघर 23, तळोजे पाच असे नवीन रुग्ण आढळले आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 9183 रुग्ण झाले असून 7459 रुग्ण बरे झाले आहेत. 1492 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 232 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये करंजाडे व सुकापूर प्रत्येकी आठ, उलवे सात, आदई व पारगाव प्रत्येकी पाच, आकुर्ली व विचुंबे प्रत्येकी तीन, गव्हाण, चिपळे, डेरवली, देवद प्रत्येकी दोन, बोर्ले, न्हावा, पळस्पे, सावळे, बारापाडा, बेलवली, चिंचवण, कराडे खुर्द, केळवणे, कोन, कोपर-गव्हाण, नारपोली, साई, शेडुंग, शिवकर, वारदोली, वाकडी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत पॉझिटिव्हची संख्या 2776 झाली असून 2295 जणांनी कोरोनावर मात केली असून 58 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत 351 जण कोरोनाग्रस्त
नवी मुंबई : नवी मुंबईत रविवारी 351 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला तर 413 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. बधितांची एकूण संख्या 20 हजार 900 तर बरे झालेल्यांची 16 हजार 656 झाली आहे. रविवारी तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 506 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांची नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 30, नेरुळ 71 वाशी 31, तुर्भे 30, कोपरखैरणे 72, घणसोली 57, ऐरोली 52, दिघा 8 अशी आहे.
रोह्यात 19 नव्या रुग्णांची नोंद
रोहे : रोहा तालुक्यात रविवारी 19 कोरोना बाधित व्यक्ती आढळले असून 17 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. आढळलेल्या रुग्णांत शहरात आठ व ग्रामीण भागात 11 व्यक्ती आहेत. यामध्ये पुरुष 13 व सहा महिलांचा समावेश आहे. तर 60 वर्षावरील पाच व्यक्ती आहेत.
उरण तालुक्यात 15 जण पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू; 13 रुग्णांना डिस्चार्ज
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण तालुक्यात रविवारी (दि.16) कोरोना पॉझिटिव्ह 15 रुग्ण आढळले, एक रुग्णाचा मृत्यू व 13 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये ओमकार कॉलनी कुंभारवाडा दोन, जेएनपीटी दोन, जासई जिजामाता हॉस्पिटल जवळ, भेंडखळ आयुश क्लिनिक जवळ, पाणदिवे, द्रोणागिरी, बोकडवीरा, गजानन निवास कुंभारवाडा, नवघर, रांजणपाडा, चीर्ले, आवरे, नारळबाग पागोटे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये जांभूळपाडा जासई दोन, जसखार दोन, वेश्वी, धुतुम, रांजणपाडा, नागाव, नागाव, बोरी, नवापाडा करंजा, मोरा, केगाव, कोप्रोली येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर आवरे येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1163 झाली आहे. त्यातील 907 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 206 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 50 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
कर्जतमध्ये सात जणांना संसर्ग
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
कर्जत तालुक्यात रविवारी नवीन सात रुग्ण आढळले असून त्यामध्ये एका पोलिसाचा समावेश आहे. आतापर्यंत तालुक्यात 666 रुग्ण संख्या झाली आहे तर 557 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाल्यानेमृतांची संख्या 29 वर गेली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये माथेरानमध्ये पोलीस ठाणे, शहरातील नानामास्तर, रिलायन्स पेट्रोल पंपा नजीकच्या वृंदावन गार्डन, तळवली, दहिवलीमधील विनायक आंगन, मुद्रे विभागातील समर्थकृपा, छोटे वेणगावमधील नवीन वसाहत येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
महाड तालुक्यात पाच जणांना लागण
महाड : प्रतिनिधी
महाड तालुक्यात रविवारी कोरोनाचे पाच नवे रुग्ण आढळून आले असून, 14 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये शिरगाव येथे चार व्यक्ती व वरंध येथे एकाचा समावेश आहे. महाडमध्ये 169 रुग्ण उपचार घेत असून, 514 रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यात एकूण 715 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.