Breaking News

पोक्सो प्रकरणातील आरोपी शिक्षकाला सशर्त जामीन

पोलादपूर : रायगड जिल्हा परिषदेच्या चोळई (ता. पोलादपूर) येथील प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आलेल्या नातेवाईक अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी शिक्षकास माणगाव येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश प्रिया बनकर यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. चोळई प्राथमिक शाळेमध्ये 31 डिसेंबर 2019 रोजी पीडित अल्पवयीन मुलीबाबत केलेली  चौकशी तसेच तिला नृत्य करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न आणि लज्जा उत्पन्न होईल अशा ठिकाणी काढलेला चिमटा याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी शिक्षक समीर काशी मुल्ला यांच्या विरोधात भादवि 354 आणि पोक्सो 2012च्या कलम 8 आणि 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply