Breaking News

‘अटल’ यशोगाथेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : प्रतिनिधी

सहकार व पणन विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अटल महापणन विकास अभियान यशोगाथेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात प्रकाशन झाले.

या वेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ऊर्जा मंत्री

चंद्रशेखर बावनकुळे, आरोग्य व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पदुम मंत्री महादेव जानकर, पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि मुख्य सचिव दिनेश कुमार जैन उपस्थित होते.

अटल महापणन विकास अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सहकारी संस्थांनी सुरू केलेल्या व्यवसायांची व बजावलेल्या कामगिरीच्या यशोगाथा या पुस्तिकेतून मांडण्यात आल्या आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply