Breaking News

जेएनपीटीत 300 कोटींचे ड्रग्ज जप्त

उरण ः प्रतिनिधी, वार्ताहर
अफगाणिस्तान येथून आलेला हेरॉइन या अमली पदार्थाचा 300 कोटी रुपयांचा साठा उरणच्या जेएनपीटी बंदर परिसरात जप्त करण्यात आला आहे. जेएनपीटी सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई केली. एका कंटेरनमध्ये इराणी टॅल्कम पावडरच्या नावाखाली हे 290 किलो हेरॉइन दडविण्यात आले होते.
हेरॉइनचा मोठा साठा सागरी मार्गाने भारतामध्ये आणला जाणार असून त्याचे मुंबई आणि दिल्लीत वितरण करण्यात येईल, अशी खबर जेएनपीटी सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. होती. या माहितीच्या आधारे या विभागाने जेएनपीटी बंदर परिसरात तपास सुरू केला. या वेळी अफगाणिस्तान येथून आलेला इराणी टॅल्कम पावडरचा एक कंटेनर जेएनपीटी बंदरात उतरवण्यात आल्याचे निदर्शनास आले. हा कंटेनर एका सीएफएस (कंटेनर फ्रेट स्टेशन्स)मध्ये ठेवण्यात आला होता. त्याचा शोध घेऊन सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी तो तपासला असता, त्यामध्ये 290 किलो हेरॉइन आढळले. हा सर्व साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे 300 कोटी आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महसूल गुप्तवार्ता संचालनालय करीत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply