Breaking News

देशात आता परिपूर्ण एकता

कलम 370 रद्दवर अर्चना ठाकूर यांची भावना

पनवेल ः रामप्रहर वृत्त

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस जम्मू-काश्मीरमधील कलम 370 केंद्र सरकारने रद्द केल्यामुळे सर्व भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले असून भारताची विविधतेत एकता ही संकल्पना खर्‍या अर्थाने परिपूर्ण झाली आहे, अशी भावना अर्चना परेश ठाकूर यांनी व्यक्त केली. भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात 73वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी सर्वांचे स्वागत केले. या वेळी प्रणाली चिकणे, स्वाती खरे, संचिता चिमणे, हिमांशु सिंह, माधुरी शेलार, संचिता करडक, सुप्रिया घाडगे, तेजस्विनी ढवळे, सुमन मंडल, ऋषिकेश पाटील, फैजान शेख, राजश्री राणे, झैद शेख या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शिक्षिका श्रुती पोटे यांनी अर्चना परेश ठाकूर, यांचे तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, कार्यकारिणी सदस्य, भंडारी, नाईक, चौगुले, विद्यार्थी यांचे आभार मानले.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply