Breaking News

वेस्ट इंडिज संघाला दंड

चेन्नई : वृत्तसंस्था

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत पराभव झाल्यानंतर वेस्ट इंडिज संघाने पहिल्याच वन डेमध्ये विजय मिळवला, मात्र या विजयानंतर त्यांना मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संघातील प्रत्येक खेळाडूच्या मानधनाच्या 80 टक्के दंड केला आहे.

चेन्नईत भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात विंडीजने आठ गडी राखून शानदार विजय मिळवला. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 288 अशी समाधानकारक धावसंख्या उभी केली होती, पण हेटमायर आणि होप यांच्या शतकी खेळीने विडींजने सहज विजय मिळवला. या विजयानंतर आयसीसीचे सामनाधिकारी (मॅच रेफरी) डेव्हिड बून यांनी संथगतीने षटके टाकल्याबद्दल विंडीज संघाला दंड केला आहे. विंडीजने भारताविरुद्ध गोलंदाजी करताना निर्धारित वेळेत चार षटके कमी टाकली होती. यामुळे बून यांनी कर्णधार पोलार्डसह संपूर्ण संघाला दंड केला आहे. खेळाडूंना 80 टक्के दंड करण्यात आला आहे. ही रक्कम त्यांच्या मानधनातून घेतली जाणार आहे. दरम्यान, संथगतीने गोलंदाजी केल्याबद्दलची चूक वेस्ट इंडिजचा कर्णधार पोलार्डने मान्य केली, तसेच आयसीसीने केलेला दंड स्वीकारला आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply