Tuesday , February 7 2023

जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांसाठी पगारवाढीचा ऐतिहासिक करार

पनवेल : रामप्रहर वृत्त

जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये असेल्या डाऊ केमिकल्स इंटरनॅशनल प्रा. लिमिटेड कंपनीमधील कंत्राटी भरघोस वेतनवाढीचा करार शनिवारी (दि. 17) येथे झाला. जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर, संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा करार विशेष म्हणजे कंत्राटी कामगारांच्या दृष्टिकोनातून कामगार विश्वातील एक ऐतिहासिक करार आहे. या करारनाम्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, डाऊ केमिकलचे एच आर मॅनेजर योगेश कुत्त्तडकर, सल्लागार आसिफ मुल्ला, संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, संघटक रविंद्र कोरडे, भाजप कामगार आघाडीचे उरण तालुकाध्यक्ष चंद्रकांत कडू, श्री. कृपा एंटरप्राइजेसचे वैभव पाटील, ओसीएस ग्रुप इंडिया प्रा लि.चे मिराज सय्यद, जेमिनी इक्विपमेंट प्रा लि.चे राहुल बालिया, मॅनपावर सप्लाय सिस्टीमचे अनिल दानी, केमस्पेक् केमिकल्स युनिट अध्यक्ष संतोष घरत, उपाध्यक्ष अंकुश घरत, कामगार प्रतिनिधी युनिट अध्यक्ष सचिन पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, चिटणीस सुरेश पाटील, सदस्य नारायण पाटील, प्रभाकर पाटील, प्रवीण पाटील, नितीन पाटील, प्रकाश सिंग, प्रकाश गडगे, सुमन दिपंकर आदी उपस्थित होते. या कंपनीत पूर्वी कामगार नेते बाबू थॉमस यांची युनियन कार्यरत होती, मात्र त्यांच्या युनियनने कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबितच ठेवले. त्यामुळे या कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे नेतृत्व स्विकारले. सुरुवातीलाच संघटनेचा झेंडा लावण्यापासून संघर्ष सुरू झाला, मात्र जितेंद्र घरत यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अडथळे पार करत 2019 पासून प्रलंबित असलेला करार यशस्वीपणे घडवून आणला. चार वर्षांसाठी झालेल्या करारानुसार पहिल्या वर्षी चार हजार, दुसर्‍या व तिसर्‍या वर्षी प्रत्येकी तीन हजार, तर चौथ्या वर्षी 2500 रुपये अशी एकूण 12 हजार 500 रुपयांची पगारवाढ करण्याबरोबरच थकबाकी, तीन लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, बोनस व इतर सर्व सोयीसुविधा देण्याचे मान्य झाले. या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जय भारतीय जनरल कामगार संघटना सातत्याने कामगारांच्या हितासाठी धडपडत असते. अनेकदा कंपनी आणि कामगार यांच्यात संघर्ष होतो. त्यामुळे दोघांमध्ये समन्वय राहत नाही. त्या कारणाने व्यवस्थापन कामगारांकडे दुर्लक्ष करते, परंतु जितेंद्र घरत आणि त्यांच्या टीमने सातत्याने याकडे प्रकर्षाने लक्ष दिले आहे. कामगार आणि कंपनी यांची प्रगती झाली पाहिजे हे एकमेव उद्दिष्ट घेऊन ते सतत काम करीत आहेत.

-आमदार प्रशांत ठाकूर, सल्लागार, जय भारतीय जनरल कामगार संघटना

बर्‍याचशा संघटना कायमस्वरूपी कामगारांचे नेतृत्व करतात. त्यांचे प्रश्न फार कमी असतात, परंतु आमच्या संघटनेची स्थापना कंत्राटी कामगारांचेही प्रश्न सोडवण्यासाठी केलेली आहे. कामगारांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

-जितेंद्र घरत, अध्यक्ष, जय भारतीय जनरल कामगार संघटना

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply