Breaking News

देवाकडे मी कधी काही मागत नाही ; 18 तासांच्या ध्यानधारणेनंतर मोदी यांची प्रतिक्रिया

रुद्रप्रयाग ः वृत्तसंस्था

निवडणूक प्रचार संपल्यानंतर केदारनाथ आणि बद्रीनाथच्या यात्रेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.19) सकाळी मीडियाशी संवाद साधला. जवळपास 17 ते 18 तास एका गुफेमध्ये ध्यानधारणा केल्यानंतर मोदी यांनी सकाळी उठून केदारनाथ मंदिरात पूजा केली. बर्‍याच काळानंतर मला गुफेत ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली, असे या वेळी मोदी यांनी सांगितले.

‘देवदर्शनाला आल्यानंतर मी देवाकडे काही मागत नाही. देवाकडे काही मागण्यावर माझा विश्वास नाही. देवाने आपली निर्मिती देण्यासाठी केली आहे, मागण्यासाठी नाही,’ असे केदारनाथमध्ये रात्रभर गुहेत ध्यानधारणा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मोदी यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या धामधुमीनंतर मला येथे ध्यानधारणा करण्याची तसेच आध्यात्मिक क्षेत्राला जाण्याची संधी मिळाली. केदारनाथच्या विकासासाठी कामे सुरू आहेत. येथे काम करण्याची संधी कमी मिळते. येथील विकासकामांवर माझे कायम लक्ष असते, असेही मोदी यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केदारनाथ धामला भेट देत महादेवाचे दर्शन घेऊन पूजाअर्चा केली. मागील दोन वर्षांतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा चौथा केदारनाथ दौरा आहे.

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय शांत आणि भावूक झालेले दिसत होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी

उत्तरे दिली.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply