सिडनी : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ हा क्रिकेट विश्वातील सध्याच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. एखाद्या क्रिकेट सामन्यात धावा जमवण्यासाठी त्याला फारसा संघर्ष करावा लागत नाही, मात्र न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात स्मिथला पहिली धाव करण्यासाठी तब्बल 45 मिनिटे आणि 39 चेंडूंचा सामना करावा लागला.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसर्या सामन्याला सुरुवात झाली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अतिशय अचूक टप्प्यावर मारा करीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर लगाम लावला. इतका की कसोटी क्रमवारीत दुसर्या स्थानावर असलेल्या स्टीव्ह स्मिथलाही धावा जमवण्यासाठी संघर्ष करावा लागला. तब्बल 45 मिनिटांनंतर आणि 39 चेंडूंचा सामना केल्यानंतर स्मिथला पहिली धाव मिळवता आली. त्यानंतर स्टेडियममध्ये बसलेल्या चाहत्यांनी शतकांनंतर जल्लोष करावा तसा जल्लोष केला. गोलंदाज वॅगनरनेही त्याची पाठ थोपटत स्मिथचे मजेशीर अभिनंदन केले.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …