पनवेल : बातमीदार
प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने अपंगांना उत्पन्नाचा दाखला, हयातीचा दाखला वाटप शिबिराचे आयोजन पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे शुक्रवारी (दि. 3) करण्यात आले होते. या वेळी जवळपास 60 ते 70 अपंग बांधवांनी दाखल्यांसाठी अर्ज केले.
अपंगांना शासकीय दाखले मिळताना बर्याच अडचणींना सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अपंगांना विनामूल्य दाखले मिळावे यासाठी प्रयत्न केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दाखल्यांसाठी शिबिर आयोजित केले होते. त्याला अपंग बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या शिबिरास प्रहार अपंग क्रांती संस्थेचे रायगड जिल्हा अध्यक्ष विष्णू धाकरस, कार्याध्यक्ष दीपक घाग, कोकण प्रदेशाध्यक्ष सुरेश मोकल, राज्याचे राज्याध्यक्ष बापू काणे, काका सवडे, शिवाजी कांबळे, नगरसेवक राजू सोनी, मंडल अधिकारी संदीप रोडे, सुरेश राठोड यांच्यासह अपंग बांधव उपस्थित होते.