Breaking News

गोवठणे येथे मसाला मिलचे उद्घाटन

उरण ः वार्ताहर

आजच्या युगात स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती केली आहे. आजची महिला अबला नसून सबला झाली आहे. एकमेकींना सहकार्य करा. सहकार्याची भावना ठेवा, असे प्रतिपादन उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी केले. उरण तालुक्यातील गोवठणे येथील गृहिणी महिला समूह मसाला मिलचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या नीता महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी नगराध्यक्ष म्हात्रे बोलत होत्या.

मसाला मिलचा उद्घाटन सोहळा रविवारी (दि. 5) कोप्रोलीजवळील पाणदिवे येथील एमएसईबी ऑफिसच्या बाजूला, एएमआर गोडाऊनसमोर पाणदिवे येथे झाला. कार्यक्रमाचे आयोजन मिलच्या संचालिका राणी सुरज म्हात्रे यांनी केले होते. या समूहात एकूण सहा बचत गट असून समूहातील महिलांनी भरपूर मेहनत घेऊन त्याची उभारणी केली आहे. यासाठी उरणचे आमदार महेश बालदी व नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी मोठे पाठबळ दिले आहे. गोवठणे गावचे भाजपचे कार्याध्यक्ष सुरज म्हात्रे यांनीही भरपूर मेहनत घेतली व सहकार्य केले.

कार्यक्रमास भाजप महिला मोर्चा उरण शहर अध्यक्षा संपूर्णा थळी, नगरसेविका जान्हवी पंडित, प्रियंका पाटील, श्री समर्थ महिला बचत गटाच्या संगीता ढेरे, ब्युटीशियन गीता पाटील, उरण तालुका महिला उपाध्यक्षा श्वेता मढवी, सामाजिक कार्यकर्त्या दर्शना माळी, खोपटे ग्रामपंचायत सरपंच विशाखा ठाकूर, कळंबुसरे ग्रामपंचायत सरपंच नूतन नाईक आदी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे राणी म्हात्रे, भाजप गोवठणे अध्यक्षा विश्रांती म्हात्रे, गोवठणे गावचे भाजपचे कार्याध्यक्ष सुरज म्हात्रे, ग्रामपंचायत कोप्रोली उपसरपंच सारीका म्हात्रे, आवरे/पाले उपसरपंच प्रणिता म्हात्रे, ग्रामपंचायत गोवठणे माजी सदस्या स्वाती पाटील, ग्रामपंचायत गोवठणे सदस्या प्राची पाटील, कोप्रोली भाजप अध्यक्ष निशा म्हात्रे, ग्रामपंचायत कोप्रोली सदस्या बेबीताई कातकरी, ग्रामपंचायत आवरे सदस्या स्वाती गावंड, ग्रामपंचायत गोवठणे माजी सदस्या स्मिता म्हात्रे, ग्रामपंचायत खोपटे सदस्या शुभांगी ठाकूर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना माळी यांनी, तर आभार प्रदर्शन राणी म्हात्रे यांनी केले.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply