माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाअंतिम सोहळ्यास भेट दिली. भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहर अध्यक्ष जयंत पगडे सोबत होते. या वेळी सुप्रसिद्ध अभिनेते प्रदीप कबरे यांनी स्पर्धेत सहभागी एकूण 65 एकांकिकांमधून अंतिम फेरीसाठी 20 एकांकिका पात्र ठरल्या आणि त्यातून चार एकांकिका बक्षीसपात्र ठरल्या, परंतु कुणावर अन्याय होऊ नये म्हणून आणखी एका एकांकिकेला बक्षीस द्यावे, अशी विनंती लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे केली. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी पाचवे बक्षीस जाहीर केले. त्यावर कबरे यांनी, अशी कलेबद्ध आस्था व आपुलकी असेल, तर एकांकिका स्पर्धा नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वास व्यक्त केला.