Breaking News

जेएसडब्ल्यूच्या प्लांटमध्ये आग; एक ठार, दोन जखमी

पेण : प्रतिनिधी

डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या सेंटर टू ऑपरेशन प्लांटमध्ये बुधवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. त्यात  एक कामगार जागीच ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भरत साहू (रा. छत्तीसगड) असे मृत कामगाराचे नाव आहे. या अपघाताला कंपनी प्रशासनाने दुजोरा दिला आहे. भरत साहू, परेश (आडनाव समजले नाही) आणि आणखी एक कामगार बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सेंटर टू ऑपरेशन प्लांटमधील मिक्सरमध्ये मटेरियल टाकण्याचे काम करीत होते. त्यावेळी अचानक आग लागून मोठा भडका उडाला. कंपनीच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. या घटनेत भरत साहू जागीच ठार झाला. तर गंभीर भाजलेल्या दोन्ही कर्मचार्‍यांना ऐरोली येथील बर्निंग सेंटर रुग्णालयात हलवले आहे.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply