Breaking News

यंग इंडियाची खिलाडूवृत्ती! पराभूत जपान संघासोबत फोटो

केपटाऊन : वृत्तसंस्था

19 वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक

स्पर्धेत भारतीय संघाने जपानवर दणदणीत विजय मिळविला. या सामन्यानंतर भारतीय संघाला विजयी फोटो काढायला पोझ करायची होती. सहसा विजयी संघ या फोटोमध्ये असतो, पण भारताचा कर्णधार प्रियम गर्ग याने नव्याने समाविष्ट झालेल्या जपानच्या संघालाही बोलावले आणि त्यांच्यासोबत फोटो काढला. त्याच्या या खिलाडू वृत्ती आणि खेळ भावनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जपानचा संघ अवघ्या 41 धावांत गारद झाला होता. त्यानंतर 42 धावांचे अतिशय सोपे आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पार केले. भारताकडून रवि बिश्नोईने सर्वाधिक चार बळी टिपले. त्याने 8 षटकांपैकी 3 षटके निर्धाव टाकली आणि केवळ 5 धावा दिल्या. कार्तिक त्यागीने 6 षटकांत 10 धावा देऊन 3 बळी घेतले. आकाश सिंगला 4.5 षटकांत 11 धावा पडल्या, पण त्याने 2 गडी बाद केले, तर विद्याधर पाटीलनेदेखील चार षटकांत 8 धावांत 1 बळी टिपला.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply