Breaking News

पालीच्या बल्लाळेश्वराची माहिती आता एका क्लिकवर; वेबसाईटचे अनावरण

पाली : प्रतिनिधी

अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी पालीतील बल्लाळेश्वर मंदिराची व देवस्थान ट्रस्टच्या उपक्रमांची इतंभूत माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. मंगळवारी (दि. 23) सायंकाळी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी प्रसिद्ध शास्त्रज्ञ श्रीराम सबनीस यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पालीतील भक्तनिवासात या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले.  ही वेबसाईट सुयोग वझे यांनी तयार केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रा. सुधीर पुराणिक यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय धारप, उपाध्यक्ष विनय मराठे, विश्वस्त माधव साने, उपेंद्र कानडे, सचिन साठे, राहूल मराठे, प्राचार्या डॉ. अंजली पुराणीक आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय गद्रे यांनी केले.

ट्रस्टच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख, सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. गरजू लोकांना, रुग्णांना व विद्यार्थ्यांना वस्तू, धान्य, सेवा व आर्थिक स्वरूपात मदत केली जात आहे. ही माहिती वेबसाईटच्या माध्यमातून दाते व भाविकांपर्यंत पोहोचेल तसेच आगामी उपक्रमदेखील लोकांना कळतील.

-अ‍ॅड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली 

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply