पनवेल ः प्रतिनिधी
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल येथे 71वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे शाळा सामिती अध्यक्ष विजय भालेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, ध्वजपथक, लेझीम पथक, तायक्वांडोची प्रात्यक्षिके सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. माध्यमिक, प्राथमिक तसेच पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे केली. त्यांचे उपस्थितांनी कौतुक केले. या वेळी विद्यालयाचे शाळा सामिती अध्यक्ष विजय भालेराव, पनवेल मनपा नवनिर्वाचित नगरसेविका व विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी रूचिता लोंढे, विद्यालयाच्या मराठी माध्यमाच्या माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुक्रमे मानसी वैशंपायन, निशा देवरे, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुक्रमे शीतल साळुंखे, मनीषा महाजन तसेच पालक व पालक प्रतिनिधी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.