Breaking News

कळंबोली हायवेवरील शौचालयाची दुर्दशा

पनवेल : वार्ताहर

पनवेलजवळील यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस महामार्ग सुरू होतो त्या ठिकाणी खूप गर्दी असते. येथे जमणार्‍या प्रवाशांसाठी शौचालय बांधून ठेवण्यात आले आहे, परंतु त्याची देखरेख व्यवस्थित होत नसल्याने त्याची अवस्था खूप वाईट झाली आहे. अनेक वेळा तेथे पाणी नसते, तर दरवाजेसुद्धा कुजलेल्या अवस्थेत आहेत व नेहमीच दुर्गंधी येत असते.

या थांब्याच्या ठिकाणी बाहेरगावी जाणार्‍यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने तिथे शौचालयाची व्यवस्था दुसरीकडे कोठे नसून जे शौचालय आहे त्या शौचालयाची अवस्था खूप बिकट  झाली आहे. यासंदर्भात सदर प्रशासनाला रितसर पत्र संतोष शिवदास आमले, अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन संघटना पनवेल तालुका व महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब जगदाळे यांनी दिले आहे व जर लवकरात लवकर त्याची व्यवस्था व्यवस्थित केली नाही तर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply