Breaking News

सरस्वती तंत्रनिकेतनमध्ये महिला प्रशिक्षण कार्यक्रम

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघरमधील सरस्वती इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीमध्ये महिला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यकमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. सुरोशे होते, तर प्रमुख पाहुणे साक्षी सागवेकर व महेंद्र राजे हे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. सुरोशे यांनी स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराबद्दल आपले मत मांडले. प्रशिक्षक म्हणून सीआरपीएफचे जवान महेंद्र राजे व त्यांच्या सर्व टीमने मुलींना आत्मप्रशिक्षणाचे

प्रात्यक्षिकाद्वारे धडे दिले. या प्रशिक्षणात महाविद्यालयातील मुली सहभागी झाल्या होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृषाली पाटील, योगिता वसू, मनीषा पाटील, प्राजली चाफले, जयश्री बदाने आदींनी परिश्रम घेतले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply