
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल येथील ब्राह्मण सभेच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नवीन पनवेल, सेक्टर 11 मधील सिडको उद्यानामधे झालेल्या या समारंभाला उत्तम प्रतिसाद मिळाला. पनवेल परिसरातील असंख्य महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. या निमित्ताने आयोजित केलेल्या विविध मनोरंजनपर खेळांचा आनंद महिलांनी घेतला. तसेच उपस्थित महिलांचे गायन, व नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. त्यानंतर सर्वांना संक्रांतीचे वाण देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपाली जोशी, आरती बोधनकर, वैशाली सरदेशपांडे, वर्षा जोशी, मंजूषा भावे, सुजाता कुलकर्णी, मुग्धा भागवत, राधिका कोल्हटकर आदी महिलांनी मोलाचे योगदान दिले.
हळदी-कुंकू या सणाला सांस्कृतिक महत्व आहेच परंतु नारीशक्ती संघटित होण्यासाठीही हा सोहळा उपयुक्त आहे. संसारात गुंतलेल्या महिलांना आनंदाचे काही क्षण उपलब्ध करून देण्याचाही ब्राह्मण सभेचा प्रयत्न आहे.
-मुग्धा भागवत, ब्राह्मण सभा