Tuesday , February 7 2023

खारघरच्या टाटा एक्ट्रेक्ट सेंटरमध्ये प्रोटोन थेरपी

पनवेल : रामप्रहर वृत्त

खारघरमधील टाटा एक्ट्रेक्ट सेंटरमध्ये लवकरच कर्करुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार पद्धतीचा वापर केला जाणार आहे. प्रोटोन थेरपी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याकरिता केला जाणार आहे. विशेष म्हणजे जगभरात सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली हि उपचार पद्धती दक्षीण आशियामध्ये खारघर टाटा एक्ट्रेक्टच्या माध्यमातुन प्रथमच  वापरली जाणार आहे. प्रोटोन थेरपी ही  कर्करुग्णांना दिली जाणारी सर्वात महागडी अशी उपचार पद्धती आहे. कर्करुग्णांच्या पेशींना नष्ट करण्यासाठी रेडिएशन दिले जाते. परंपरागत चालत आलेल्या रेडिएशनचा उपचार पद्धतीत कर्करुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रोगी पेशींसह निरोगी पिशीदेखील यामुळे मृत पावत असल्याने घातक परिणाम कर्करुग्णांवर जुन्या पद्धतीने दिल्या जाणार्‍या रेडिएशमुळे होतो. या वेळी अनेक रुग्णांचे केस देखील गळत असतात. मात्र नव्याने अवगत झालेल्या प्रोटोन थेरपीमुळे रुग्णांना होणार त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची एका हजार टनाची ही यंत्रणा आहे. अमेरिकेत याच थेरपीसाठी किमान 70 लाख रुपये मोजावे लागतात. भारत सरकाराच्या परमाणू ऊर्जा विभागाच्या मदतीने ही यंत्रणा खारघर टाटा रुग्णालयात उभारण्यात येत आहे. संबंधित यंत्रणा कार्यान्वित होण्यास अद्याप सहा ते सात महिन्याचा कालावधी लागेल अशी माहिती खारघर टाटा एक्ट्रेक्ट सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी दिली. या  थेरपीमुळे कर्करुग्णांना होणार केस गळती अंग दुखीचा त्रास कमी होणार आहे. विशेष म्हणजे रेडिएशनमुळे निरोगी पेशींना होणारी इजा यामुळे कमी होणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत स्वरूपात हे उपचार खारघर येथे दिले जाणार आहे. दिवसभरात सुमारे 30 ते 40 रुग्णांना याठिकाणी प्रोटोन थेरपी दिली जाणार आहे. 6500 चौरस फुट जागेमध्ये ही यंत्रणा ठेवली जाणार आहे.

Check Also

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया …

Leave a Reply