
मोहोपाडा : प्रतिनिधी
रसायनी पाताळगंगा अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामांचे भूमिपूजन होवून परिसरात होणार्या विकासकामांमुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे. ग्रामपंचायत हद्दीतील कराडे खुर्द गावात याअगोदर सांडपाणी निचरा होण्यासाठी गटारांची व्यवस्था नसल्याने नागरिकांसमोर समस्या होती. या समस्येचे निराकरण व्हावे यासाठी नागरिकांनी माजी सरपंच किरण माळी व माजी सरपंच विजय मुरकुटे यांच्याकडे मागणी केली होती. या वेळी किरण माळी व विजय मुरकुटे यांनी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून नागरिकांसमोरील खोळंबलेली समस्या सोडवावी अशी सरपंच भारती चितले यांच्याकडे मागणी करुन पाठपुरावा केला होता. दरम्यान, ग्रामपंचायत निधितून कराडे खुर्द गावात सांडपाणी गटार बांधकामांचे भूमिपूजन सरपंच भारती चितले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीत मिटींग हॉल, ग्रामसेवक केबिन, किचन व्यवस्था, सरपंच केबिन फर्निंचर कामाचेही उदघाटन करण्यात आले. या वेळी सरपंच भारती चितले, उपसरपंच मुकेश पाटील, ग्रामसेवक संदिप धारणे, माजी सरपंच किरण माळी, माजी सरपंच विजय मुरकुटे, माजी सरपंच उज्वला तुंगारे, योगेश मुरकुटे, विशाल मुरकुटे, ग्रामपंचायत सदस्य यशश्री मुरकुटे, नलिनी कारंदे, प्रमिला पाटील, रेवती भोईर, माधुरी चितले, संतोष म्हात्रे, नितेश कारंदे आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत शौचालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून कराडे खुर्द ब्राम्हणआळी रस्त्याचे काँक्रीटिकरण, कासप रस्ता व गटार आदी विकासकामे लवकरच सुरू होणार असल्याचे माजी सरपंच किरण माळी यांनी सांगितले.