शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेवरून भाजप आक्रमक

पेण : प्रतिनिधी
राज्यातील अपयशी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. 25) पेण तालुका भाजपच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी, शेतकर्यांचा सातबारा कोरा करणे, महिलांवरील अत्याचार हे प्रमुख विषय हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून, त्याचा निषेध म्हणून ठिय्या आंदोलन करण्यात आले. भाजपचे पेण तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील व शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात नगराध्यक्षा प्रितम पाटील, नगरपालिका गटनेते अनिरुद्ध पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस बंडू खंडागळे, विनोद शहा, नगरसेवक राजा म्हात्रे, प्रशांत ओक, माजी सभापती प्रकाश पाटील, व्ही. बी. पाटील, पूजा पाटील, भास्कर पाटील, रेवती पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. ठिय्या आंदोलनानंतर भाजपच्या वतीने पेण तालुक्यातील विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. अरुणा जाधव यांना देण्यात आले.

माणगाव : प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात माणगाव तालुका भाजपने मंगळवारी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत घोषणा बाजी केली. या वेळी तालुका भाजपच्या वतीने माणगाव तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
शेतकर्यांची कर्जमाफी, महिलांवरील वाढते अत्याचार, महिलांची सुरक्षितता याबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या नेतृत्वाखाली माणगाव तहसिल कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन केले. भाजपचे जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, ज्येष्ठ कार्यकर्ते भालचंद्र महाले, तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे, माजी तालुकाध्यक्ष सुरेंद्र साळी यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी जो महिलाओंकी सुरक्षा नही कर सकी, वो सरकार निकम्मी है, महाभकास आघाडीचा धिक्कार असो, शेतकर्यांना फसविणार्या सरकारचा धिक्कार असो, अशा विविध घोषणा देत तहसिल कार्यालयाचा परिसर दणाणून टाकला.
या धरणे आंदोलनात भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते भालचंद्र महाले, माजी तालुकाध्यक्ष सुरेंद्र साळी, जयेंद्र मुंढे, योगेश राणे, वसंत शेडगे, बाबुराव चव्हाण, अण्णा कुरळे, उमेश साटम, संजय जाधव, महिला मोर्चाच्या शर्मिला सत्वे, दीपाली जाधव, यशोधरा गोडबोले, स्मिता भोईर, दीप्ती नकाशे, नीलम काळे, उषा महाडिक यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मुरुड : प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात मुरूड तालुका भाजपच्या वतीने मंगळवारी येथील तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी महाविकास आघाडी सरकारावर टीका करण्यात आली. तसेच आघाडी सरकार मुर्दाबाद आशा घोषणा देण्यात आल्या.
मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष महेश मानकर, शहर अध्यक्ष प्रवीण बैकर, सरचिटणीस नरेश वारगे, ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे, सुधीर पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष दिपक गिते, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमीन खानजादा अल्पसंख्याक महिला मोर्चा अध्यक्षा नजमा उलडे, माजी तालुका अध्यक्ष जयवंत आबाजी, शैलेश काते, जीवन सुतार, अभिजित पानवलकर, समीर शिंदे, विनोद भगत, हरीश आरकशी, हमीद उलडे, प्रवीण भाटकर, सुदाम वाघीलकर, हरीष पाटील, उमेश माळी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा तसेच माजी आमदार वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

रोहे ः प्रतिनिधी
महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकर्यांची झालेली फसवणूक, महिलांवरील वाढलेले आत्याचार, युती सरकारच्या काळातील महत्वाकांक्षी प्रकल्पांना दिलेली स्थगिती या विरोधात भाजपच्या वतीने मंगळवारी रोहा तहसिल कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. रोहा तहसिलदार कविता जाधव यांना या वेळी निवेदनही देण्यात आले.
या राज्य सरकारने दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप भाजप माजी जिल्हा अध्यक्ष संजय कोनकर यांनी या वेळी केला. भाजप सरकारने शेतकर्यांसाठी आणलेल्या जलशिवारसारख्या योजना आणल्या होत्या. त्यांना स्थगिती देण्याचे काम या महाविकास आघाडी सरकारने केले असल्याचे युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी सांगितले. सोपान जांभेकर, तानाजी देशमुख यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
या मोर्चात भाजप माजी जिल्हाध्यक्ष संजय कोनकर, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, भाजप तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, ज्येष्ठ नेते मारूतीराव देवरे, तानाजीराव देशमुख, विष्णु मोरे, तालुका सरचिटणीस आनंद लाड, संजय लोटणकर, शहर अध्यक्ष शैलेश रावकर, नवनित डोलकर, उत्तम नाईक, सनिलकुमार, बबलू सय्यद, नरेश कोकरे, राजेश डाके, अरूण वाघमारे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मेघना ओक, श्रद्धा घाग, जयश्री भांड, सीमा कोनकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सकाळी रोहे शहरातील राम मारुती चौकातून निघालेला हा निषेध मोर्चा बाजारपेठ, फिरोज टॉकीज मार्गे तहसिल कार्यालयावर धडकला. त्यानंतर तहसीलदार कविता जाधव यांना निवेदन देण्यात आले.