Breaking News

पनवेलमधील ओवेत नळपाणी योजनेची वचनपूर्ती

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून ओवे गावातील पाण्याची समस्या सुटली असून या नळपाणी योजनेचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) करण्यात आले. येथील समस्यांसंदर्भात परेश ठाकूर यांनी पाहणी दौरा करून समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नळपाणी योजना कार्यान्वित झाली आहे.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक हरेश केणी, पापा पटेल तसेच मन्सूर पटेल, साजिद पटेल, भाजप युवा मोर्चा खारघर अध्यक्ष विनोद घरत, एजाज पटेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी माजी नगरसेवक हरेश केणी यांनी सांगितले की, आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रात विकासाची अनेक कामे होत आहे. नागरिकांनी आपल्या समस्या आमच्यापर्यंत पोहचव्यात. आम्ही त्या सोडवण्याचे काम करू.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply