जर्सीत दिसली असती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत यजमान इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया नवीन जर्सीमध्ये मैदानात उतरली. 27 वर्षांपूर्वीच टीम इंडिया भगव्या रंगाच्या जर्सीत दिसली असती. मात्र परिस्थिती पाहून टीम इंडियाला निळ्या रंगाच्या जर्सीची निवड करावी लागली होती.
एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपमध्ये 1992पासून रंगीत जर्सी घालून खेळण्याची प्रथा सुरू झाली. सर्वच संघांनी आपल्या राष्ट्रध्वजातील रंगाला पसंती दिली. भारताचा संघ व्यवस्थापकदेखील तिरंग्यातील रंग निवडणार होता, परंतु तसे होऊ शकले नाही. कारण भारताचा शेजारील पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचा रंग हिरवा आहे. त्यामुळे त्यांनी हिरव्या रंगाची जर्सी निवडली, तसेच केसरी रंग एका विशिष्ट राजकीय पक्षाशी जोडला गेला होता. त्यामुळे तो रंगदेखील निवडण्यात आला नाही. पांढरा रंग कसोटीसाठी वापरण्यात येत असल्याने त्या रंगाचीही निवड करण्यात आली नाही. त्यामुळे टीम इंडियाने निळ्या रंगाची जर्सी निवडली. तिरंग्यामध्ये निळा रंगात अशोक चक्र आहे. 24 आर्यांच्या अशोक चक्राचा रंग निळा असल्याने जर्सीसाठी तो रंग निवडण्यात आला. आजही जर्सीचा हा रंग कायम आहे.