पनवेल : वार्ताहर
पनवेल महानगरपालिकेने खारघर वसाहतीमध्ये बंदी असतानाही काही दुकानदार प्लॅस्टिकचा वापर करीत असल्याने त्यांच्या विरोधात धडक कारवाई करीत दंडात्मक रक्कम वसूल केली आहे.
खारघर वसाहत परिसरात काही दुकानदार मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे खारघरचे प्रभाग अधिकारी भगवान पाटील, स्वच्छता अधिकारी जितू मढवी व त्यांच्या पथकाला मिळताच त्यांनी येथील ब्युटीफूल, फ्रेश भाजी मार्केट, कृष्णा दूध डेअरी आणि एक चायनिज फूड हॉटेलमध्ये कारवाई करीत त्यांच्याकडून पाच किलो प्लॅस्टिक आणि 40 हजाराची दंडवसुली केली आहे. आगामी काळात सुद्धा अशाच प्रकारे कारवाई खारघर वसाहतीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांकडून देण्यात आली.