Breaking News

महाडमध्ये विरेश्वर महाराज छबिना उत्सव

महाराजांच्या आशीर्वादानेच काम करण्याची ताकद मिळते -आ. प्रवीण दरेकर

महाड : प्रतिनिधी

कोकणातील प्रसिद्ध आणि सर्वांत मोठ्या महाडच्या विरेश्वर महाराज छबिना उत्सवाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. त्यांनी विरेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन देवळाचा नगारा वाजवून मानवंदना दिली. या वेळी बोलताना त्यांनी देवस्थानसाठी यापुढेही निधी कमी पडू देणार नाही, असे सांगितले. महाडचे ग्रामदैवत विरेश्वर महाराज यांचा मुख्य छबिना उत्सव मंगळवारी (दि. 25) रात्री साजरा करण्यात आला. या छबिन्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे व संपूर्ण कोकणातून लाखो भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान, मध्यरात्री विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाड छबिना उत्सवाला भेट दिली. या वेळी त्यांनी विरेश्वर महाराजांचे दर्शन घेतले, तसेच ग्रामदैवत रवळनाथाच्या पालखीसमोर ते नतमस्तक झाले.

श्री विरेश्वर महाराजांचा मी भक्त असून, त्यांच्याच आशीर्वादाने मला काम करण्याची ऊर्जा मिळते आणि त्यामुळेच विरोधी पक्षनेता ही मोठी जबाबदारी मिळाली आहे. या संधीचा मी महाड, पोलादपूरच्या विकासासाठी फायदा करून घेईन.

-प्रवीण दरेकर, आमदार, विरोधी पक्षनेते

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply