Breaking News

पायरमाळ येथील रस्ता होणार चकाचक

नेरळ विकास प्राधिकरणातून 15 लाखांचा निधी मंजूर

कर्जत : बातमीदार

नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील गणेशनगर पायरमाळ भागातील रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा कराळे यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्याच्या कामासाठी नेरळ विकास प्राधिकरणाकडून 15 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पायरमाळ येथील ग्रामपंचायत सदस्या श्रद्धा कराळे यांच्या घरापासून ते कर्जत-कल्याण राज्यमार्गापर्यंतच्या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. ग्रामपंचायत या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे येथील भाजपच्या ग्रामपंचायत सदस्या श्रद्धा कराळे आणि राजन लोभी यांनी भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्याकडे या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली होती. म्हसकर यांच्या प्रयत्नांमुळे नेरळ विकास प्राधिकरणाने या रस्त्याच्या कामासाठी 15 लाख रुपयांचा निधी दिला असून, त्यातून 150 मीटर लांबीच्या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.

या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा नरेंद्र कराळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाजप कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हासकर, ग्रामपंचायत सदस्य धर्मानंद गायकवाड, उमा खडे, माजी सदस्य नितेश शाह, नेरळ विद्या मंदिरचे माजी मुख्याध्यापक पी. बी. राठोड, सुधाकर देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त …

Leave a Reply