Breaking News

मांडवा येथे जिल्हास्तरीय कबड्डी महोत्सव

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मांडवा येथे टाकादेवी स्पोर्ट्स क्लब व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 16 व 17 मार्च रोजी जिल्हास्तरीय कबड्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात महिला व पुरुष गटाचे सामने होणार आहेत. 

स्व. निलम शशिकांत दळवी यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धा 16 मार्च रोजी होणार आहे. दुपारी 2  वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल. स्पर्धेतील विजेत्या संघास 10 हजार रुपये व चषक, उपविजेत्यास 7 हजार रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 5 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभाग घेणार्‍या सर्व संघांना स्वर्गीय निलम शशिकांत दळवी स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले जाणार आहे, तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्टखेळाडूस एक हजार रुपये व चषक, उत्कृष्ट पकड व चढाईसाठी प्रत्येकी पाचशे रुपये व चषक बक्षीस देण्यात येईल.

पुरुष खुल्या गटाची 17 मार्च रोजी होईल. दुपारी 2 वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास 30 हजार रुपये व चषक, उपविजेत्या संघास 20 हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकाच्या दोन संघांसाठी  (उपांत्य उपविजेते) 15 हजार रुपये व चषक, तसेच उपउपांत्य फेरीत पराभूत झालेल्या चार संघांना प्रत्येकी 5 हजार रुपये व चषक देऊन गौरविले जाणार आहे. स्पर्धेचा मानकरी, उत्कृष्ट पक्कड, उत्कृष्ट चढाई  अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी सौरभ पाटील (9623849611), प्रसाद घरत (9146044691), अंकुर घरत (9527090760), कुलदीप पाटील (9850398559), विकास म्हात्रे 8766762043 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन टाकादेवी स्पोर्टस् क्लब व ग्रामस्थ मंडाळाचे अध्यक्ष केशव पाटील, उपाध्यक्ष अशोक घरत यांनी केले आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply