Friday , September 22 2023

प्रजनेश गुणेश्वरचे आव्हान संपुष्टात

इंडियन वेल्स : वृत्तसंस्था

भारताचा अव्वल टेनिसपटू प्रजनेश गुणेश्वरनची इंडियन वेल्समधील शानदार वाटचाल संपुष्टात आली आहे. प्रजनेशनला क्रोएशियचा खेळाडू इवो कार्लोविचविरुद्ध 3-6, 6-7 (4-7)ने पराभव स्वीकारावा लागला.

पहिला सेट एकतर्फी झाल्यानंतर दुसर्‍या सेटमध्ये प्रजनेशने जबरदस्त झुंज देताना कार्लोविचला चांगली लढत दिली. या वेळी सेट टायब्रेकमध्ये गेल्यानंतर मोक्याच्या वेळी प्रजनेशने केलेली माफक चूक निर्णायक ठरली.

याचा अचूक फायदा उचलत कार्लोविचने बाजी मारत पुढच्या फेरीत प्रवेश केला. ही लढत एक तास 13 मिनिटे रंगली.

जागतिक क्रमवारीत 97व्या स्थानावर असलेला प्रजनेश प्रथमच एटीपी मास्टर्स स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यात त्याने चमकदार कामगिरी करीत 61 गुण मिळविले. याचा त्याला जागतिक क्रमवारीत मोठा फायदा होणार असून, तो आता कारकिर्दीमध्ये सर्वोत्तम 82व्या स्थानी येईल.

Check Also

वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; 15 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना

मुंबई : प्रतिनिधी यंदा भारताच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणार्‍या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी (दि. …

Leave a Reply