Breaking News

आगरी साहित्य संमेलन उदंड उत्साहात

उरण ः प्रतिनिधी

आगरी समाजाच्या 18व्या आगरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ संगीतकार अच्युत ठाकूर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक हरिभाऊ घरत होते. या वेळी व्यासपीठावर मान्यवर उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमात अनेक विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले, तसेच कविसंमेलन, परिसंवाद, महिलांवरील अत्याचार आदी विषयांचा यात अंतर्भाव होता. प्रथम ग्रंथदिंडी काढून साहित्य संमेलनास सुरुवात झाली. संपूर्ण भेंडखळ गावातून ग्रंथांची पालखी काढण्यात आली.  या वेळी अनेक मान्यवरांना आगरी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार मधुकर ठाकूर, ज्येष्ठ नाटककार हसुराम पाटील यांचा समावेश होता. या साहित्य सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार दा. चा. कडू, धनंजय गोंधळी, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, प्रदीप ठाकूर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील ‘एल.के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा

मनपा लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे सेक्टर २२ येथील प्लॉट क्रमांक ७३/७४वर असलेल्या …

Leave a Reply