पेण : प्रतिनिधी
कोरोना आजाराचा संसर्ग होऊ नये, म्हणून मास्क वापरण्याचा व हात धुण्यासाठी सॅनिटायझर्सचा वापर करायचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्यामुळे मास्क व सॅनिटायझर्स विक्रीत अचानक वाढ झाली असून, पेण तालुक्यातील अनेक मेडिकलमध्ये मास्क व सॅनिटायझर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेण येथून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पनवेल येथे 1 आणि आणि पुणे येथे 15 रुग्ण आढळल्याने सतर्कता बाळगली जात आहे. कोरोना आजारामुळे डेटॉल मास्क व सॅनिटायझरच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पेण तालुक्यात मात्र मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा झाला असून, याला औषधविक्रेत्यांनीही दुजोरा दिला आहे.