Breaking News

नोकरीचे आमिष दाखणार्याला पनवेल पोलिसांनी केली अटक

पनवेल : बातमीदार

एलएनटी कंपनीमध्ये व्यवस्थापक असल्याचे भासवून नोकरीला लावण्याचे आमिष देऊन महाराष्ट्रातील इतरत्र भागातील बेरोजगार तरुण तरुणींना गंडा घालणार्‍याच्या कारनाम्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पनवेलमधील एका जागृत पत्रकाराने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत शहर पोलिसांनी ठाणे येथील चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपीच्या मुसक्या आवळल्या असल्याने पोलिसांच्या या कर्तबगारीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या वेळी शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीला ठेवण्यात आले असून अशाप्रकारे फसवणूक झालेल्या तरुणांनी शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले. शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल तारमळे, पोलीस हवालदार राऊत, आयरे, पोलीस नाईक वाघमारे, मोरे, पोलीस शिपाई गर्दनमारे, घुले यांनी आरोपी मनोज चौगुले यांच्या दूरध्वनी क्रमांक 7977790366 या नंबरवरून तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केली. व त्याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला शुक्रवारी (दि. 10)न्यायालयात नेण्यात आले.

पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनूसार अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीने अशा प्रकारे अनेक तरुण-तरुणींना गंडा घातला असल्याचे तपासात समोर येत आहे, त्यामुळे अशा पद्धतीने जर कोणी आपल्याशी संपर्क साधून पैसे मागत असेल अथवा मागितले असतील, तर सुजाण नागरिक बनून जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा

-अजयकुमार लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply