Breaking News

बाजारात होळीची लगबग; नैसर्गिक रंगाने बाजारपेठा फुलल्या

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

होळी व धूलिवंदनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारात रंग पिचकारीने बाजारपेठ रंगली आहे. रंगपंचमीनिमित्त लहान मुलांच्या पिचकारी खरेदीकरिता ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. वाशीतील घाऊक बाजारात विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, लहानग्यांचे आकर्षण असणार्‍या विविध प्रकारच्या पिचकर्‍यांनी बाजारपेठ फुलली आहे. याच्या खरेदीला ग्राहकांची व लहानग्यांच्या झुंबड उडाली आहे. येथील बाजारात नवी मुंबईसह मुंबई उपनगरातील ग्राहक स्वत:त घाऊक दरात वस्तू मिळत असल्याने जादा ग्राहक खरेदीला येत असतात. बाजारात रंगाचे, पिचकार्‍यांचे दर तेवढेच असून नैसर्गिक रंगाला अधिक मागणी आहे. नैसर्गिक सुखे रंग 80 ते 100 रुपये तर ओले रंग 180 रुपयांवर उपलब्ध आहेत. 190 ते 500 रुपयांपर्यंत बाजारात विविध प्रकारच्या पिचकार्‍या उपलब्ध असून यामध्ये विविध कार्टून्सच्या पिचकार्‍यांची क्रेज लहान मुलांमध्ये असते. यंदा मात्र पब्जी या खेळाची पिचकारी उपलब्ध असून लहानग्यांमध्ये याची अधिक क्रेज आहे. विविध डिझाइनच्या पिचकारी 80 ते 450 रुपयांवर तर पबजी पिचकारी 190 ते 500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

सध्या बाजारात होळीनिमित्त रंग, पिचकारी खरेदीला ग्राहकांची लगबग सुरू असून ग्राहक नैसर्गिक रंगाला अधिक पसंती देत आहेत. त्याचबरोबर लहान मुले पबजी पिचकारीची मागणी करीत असतात. दररोज 30 ते 40 पबजी पिचकर्‍यांची विक्री होते.
-विष्णू पटेल, 
विक्रेता, वाशी बाजार

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply