मुरूड ः प्रतिनिधी – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुरूडमध्ये मास्कची कमतरता असल्याने मानव अधिकारी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांनी मुरूडमधील गरीब, गरजू नागरिकांना 900 मास्कचे वाटप केले. मुरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या हस्ते मास्कवाटप करण्यात आले. त्यानंतर सर्व सदस्यांनी दोघा दोघांचे ग्रुप करून गरीब, गरजूंना मास्कवाटप केले. बाजारात एक मास्क 30 रुपयांना विकला जात आहे. गरीब लोकांनाही मोफत मास्क मिळावा यासाठी मानव अधिकार संघटनेच्या माध्यमातून यासाठी पुढाकार घेण्यात आला.
या वेळी मानव अधिकारी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे, क्रिती शहा, इम्यिताज गोलंदाज, दिनेश बोर्जी, गणेश शिर्के, हर्षद साठे, मुरूड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय करडे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ आदींसह सदस्यांनी नागरिकांना मास्कचे वाटप केले.