पनवेल : रामप्रहर वृत्त
करंजाडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत मंगेश शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते विविध विकासकामे या विभागात करीत आहेत. त्याअंतर्गत भाजपचे अशोक विखारे यांनी काही दिवसांपूर्वी सेक्टर 6 येथे रिक्षा स्टँन्डचे सुशोभीकरण केले होते हाच राग मनात धरून काही समाज कंटकांनी अशोक विखारे यांच्यावर प्रणघातक हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्नालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, या मागचा सुत्रधार सनी कैकाडी असल्याचे विखारे यांनी सांगितले आहे. कैकाडीच्या सांगण्यावरूनच कवीश, रितेश गायकवाड आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींनी अशोक विखारे यांची रिक्षा सेक्टर 3 कॉलेज फाट्याकडे जाणार्या रस्त्यावर आडवून शिवीगाळ आणि धमकी दिली तसेच ठार मारण्याच्या उद्देशाने गळ्यावर ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न केला. आरोपी कविश याने बियरची बाटली विखारे यांच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले.